कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून कडक निर्बंध घातले आहेत. यात सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तरीसुद्धा विनाकारण फिरू नका, असे वारंवार सांगूनही लोक दुचाकी घेऊन फिरत आहेत. अशी १५ हजारांहून अधिक वाहने गेल्या तीन महिन्यांत जप्त केली आहेत. तर मोटार वाहन कायद्यानुसारही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे गरजेचा असताही काही लोक विनामास्क फिरत होते. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई झाली आहे. मॉर्निंग वॉकच्या अडीच हजार केसेस करून दंड वसूल केला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पोलिसांची कामगिरी अव्वल ठरली आहे.
-----
तीन महिन्यांतील कारवाई अशी,
१) विनामास्क - ५४,०२७ केसेसद्वारे - १ कोटी ८ लाख ५ हजार ६०० वसूल
२) मोटर वाहन कायदा -१ लाख ४२ हजार ५६७ केसेसद्वारे -२ कोटी ४३ लाख ७९ हजार १०० वसूल
३) आस्थापना उघडणे - २ हजार ७८२ केसेसद्वारे -२४ लाख ६९ हजार दंड वसूल
४) मॉर्निंग वॉक -२ हजार ५३६ केसेसद्वारे -१० लाख ४५ हजार दंड वसूल
५) वाहने जप्त - १५ हजार ९७६ व २५९ इतर गुन्हे दाखल