कोल्हापूर : शहरात शुक्रवारी एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल ५०० जणांकडून ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरने तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४४७ जणांकडून ४४ हजार ७००, सामाजिक अंतर न ठेवल्याबददल २१ जणांकडून दहा हजार २००, मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबद्दल २८ जणांकडून पाच हजार ६०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल चारजणांकडून ८०० रुपयांचा दंड वसूल केला.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्राधान्याने अमलात आणाव्यात, कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
एका दिवसात ६१ हजारांवर दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 6:58 PM
CoronaVirus, mask, kolhapurnews कोल्हापूर शहरात शुक्रवारी एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल ५०० जणांकडून ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.
ठळक मुद्देएका दिवसात ६१ हजारांवर दंड वसूलतब्बल ५०० जणांकडून दंड वसूल