कोल्हापूर : कोरोना संसर्गात प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून शनिवारी सुमारे ५ लाख ५८ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलाने जिल्ह्यात ही कारवाई केली. यामध्ये सुमारे १,८६५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनापरवाना आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल लाखावर दंड वसूल केला.
जिल्ह्यात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाई सत्र सुरु आहे. शनिवारी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ४६४ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९४ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. कागदपत्रे नसणाऱ्या १,७६८ वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय ९७ वाहनांवर जप्तीची कारवाई केली. विनापरवाना आस्थापना सुरु ठेवल्याबद्दल ८५ आस्थापनाधारकांकडून १ लाख ४ हजार रुपये दंड वसूल केला. मॉर्निंग वॉकप्रकरणी १४ जणांकडून १,३०० रुपये दंड वसूल केला.