कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीत नियामंचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत मंगळवार दिवसभरात पोलिसांनी विनामास्क व वाहनधारकांकडून सुमारे सहा लाख रुपये दंड वसूल केला. त्यात २४७२ वाहनांचालकांकडून चार लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसुल केला; तर २७२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी पुकारली आहे. त्यादरम्यान जिल्ह्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहर व मोठ्या गावातील चौका-चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. मंगळवारी दिवसभरात तब्बल २२०० वाहनधारकांकडून चार लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला, तर २७२ वाहने जप्त केली; तर विनामास्क फिरणाऱ्या ४१८ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख ११ हजार ९०० रुपये दंड वसूल केला.