शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 7:38 PM

मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले

ठळक मुद्देउघड्यावर टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने दुर्गंधी

ज्योती पाटील ।पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये असणाºया विविध प्रकारचा कचरा व कातडी जळाल्याचा वास पसरत असल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. कचºयापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडल्याने कचºयाची विल्हेवाट लागणार की नाही, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारकांतून विचारला जात आहे.

चित्रनगरी परिसर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक पार्क, के.एम.टी. कॉलनी, धन्वंतरी कॉलनी या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने गोळा केलेला कचरा पसरत असल्याने कचरा जाळून टाकण्याचा खटाटोप ग्रामपंचायतीमार्फत केले जातात. परंतु, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होताना पाहावयास मिळत आहेत.

या कचºयातील कुजलेले अन्न, ओला कचरा,प्लास्टिक कचरा तसेच धन्वंतरी कॉलनीमध्ये असलेल्या चपलच्या कारखान्यातील कातड्याचे तुकडेदेखील या कचºयाच्या ढिगात टाकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरतेच; परंतु याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. या परिसरात असणाºया नामांकित भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या आसपास असणाºया वसतिगृहाचा आसरा घेतात; परंतु वसतिगृहावर दिवस-रात्र धुराचे लोट येत असल्याने त्यांना राहणे मुश्कील झालेआहे.

जवळजवळ तीन-चार टन गोळा केलेला कचरा दररोज या ठिकाणी आणून टाकला जातो. अनेक वर्षांपासून कचºयाचे ढीग येथे असल्याने त्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलने, तक्रारी शासन स्तरावर झाल्या; परंतु कचरा प्रकल्प अद्यापही कागदोपत्रीच अडकला आहे. हा कचरा प्रकल्प लवकरात लवकर करावा, अशी मागणी येथील रहिवासी व वाहनधारकांतून जोर धरू लागला आहे.घसादुखीकचºयातील कुजलेले अन्न, प्लास्टिक व चप्पल कारखान्यातील कातडी जळालेल्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, घसादुखी व श्वसनाचे आजार उद्भवले आहेत. 

गेली अनेक वर्षांपासून या कचºयामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत असून, आता गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आजारांशी सामना करीत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा लेखी तक्रार करूनदेखील प्रशासनाला जाग येत नाही.- चंद्रकांत बराले, नागरिकवर्षानुवर्षे आम्हाला या कचºयामुळे त्रास होत आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूस हा कचरा ढीग असल्याने आमचे घर कचरा डेपोतच आहे, असे वाटते. तसेच जळालेल्या कचºयाचा धूर नेहमी घरात आल्याने लहान मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवले आहेत. - शंकर सातपुते, नागरिक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण