शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Kolhapur News: ट्रान्सफार्मर फुटून आगीचा भडका, विद्युत वाहिन्या जळून खाक; निम्म्या इचलकरंजीत वीज खंडित 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 1:37 PM

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा व अग्निरोधकच्या साहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणली.

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयालगतच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर फुटून आगीचा मोठा भडका उडाला. त्यामध्ये बी झोनच्या मोठ्या विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे १० एम. ए. पॉवरचे तीनही ट्रान्सफार्मर बंद पडून निम्म्या इचलकरंजी शहराचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा व अग्निरोधकच्या साहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणली.त्यानंतर पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.शहरातील सर्वाधिक वीजपुरवठा करणारे बी झोन कार्यक्षेत्रातील सबस्टेशन स्टेशन रोडवर आहे. तेथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे शहरातील निम्म्या भागात विद्युतपुरवठा खंडित झाला. आसपासचे महावितरण कर्मचारी आग विझवण्यासाठी धावले. अग्निरोधकाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निरोधक व पाण्याचा मारा करून तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी सबस्टेशनमधील मोठ्या विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्या. यावेळी करंट प्रोटेक्शन पॉवर ट्रान्सफार्मरमधील बुशिंग फुटून ऑईलमुळे आग लागल्याचे महावितरणच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. सबस्टेशनमधून होणारा खंजिरी इंडस्ट्रीज भाग, तीन बत्ती चौक परिसर, जवाहरनगरचा काही भाग, भोने मळा, एएससी कॉलेज, शाहू पुतळा, आयजीएम परिसर आदी भागांतील विद्युत पुरवठा बंद झाला. त्वरित महावितरणने भागात पर्यायी मार्गाने विद्युतपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील जीआय सबस्टेशन, इचलकरंजी वन टेन, आवाडे सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे काम सुरू होते. कोल्हापूर महावीर महावितरणचे विशेष पथक येथील महावितरण कार्यालयात दाखल झाले आहे. तपासणी व दुरुस्ती करून शुक्रवारी (दि.२४) सकाळपर्यंत बंद पडलेल्या सबस्टेशनमधील वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणfireआग