धावत्या कारला अचानक आग लागून कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना संकेश्वर शहरालगत पी.बी. रोडवर घडली. सोमवार (५) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, कलगोंडा बसगोंडा पाटील (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांनी शेरेलोट कंपनीची क्रुझ कार क्रमांक एमएच १४, सीसी २२९६ मधून नातेवाइकांना बेळगाव येथे दवाखान्यात उपचार घेऊन कोल्हापूरला परत येते होते.
दरम्यान, संकेश्वरनजीक आल्यावर साई पेट्रोलपंपाजवळ असताना कारच्या आरशात टायरमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चालकाने त्वरित कार रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतील इतरांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
परिणामी, अचानक कारला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने मार्गावरील नागरिकांनी संकेश्वर अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन पथक पोहोचून आग विझविली. मात्र, तोपर्यंत गाडी आगीत भस्मसात झाली होती. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.
---------------------------------
* फोटो ओळी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक कोल्हापूर येथील बसगोंडा पाटील यांच्या शेरेलोट कारने पेट घेतल्याने गाडी आगीत भस्मसात झाली.
क्रमांक : ०६०४२०२१-गड-०५