याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजू कुरुंदवाडे, शंकर तनंगे, शीतल तनंगे, राजू किणिंगे, जितेंद्र खोत, आदींची शेती जुना चंदूर रोड परिसरात आहे. या शेतीमधून उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली आहे. मंगळवारी दुपारी या वाहिनीचे शॉर्टसर्किट होऊन उसाच्या शेतीला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केल्याने सुमारे ४० एकरांतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर अग्निशामक दलाच्या चार गाड्यांही तातडीने दाखल झाल्या. आगीचे प्रमाण मोठे असल्याने ती विझवताना अडथळे निर्माण होत होते. हातातोंडाशी आलेला ऊस जळून खाक झाल्यामुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
(फोटो ओळी)
२९१२२०२०-आयसीएच-०७
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ४० एकरांतील ऊस जळून खाक झाला.