ही आग विझविण्याचा ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी राखून ठेवलेल्या ठकू झोरे यांची पिंजराची गंज, दहा हजार गवताची कट, कडबा व वर्षभराचे सरपण या आगीच्या भस्मसात जळून खाक झाले. त्यामुळे जनावरांना जगवायचे कसे? हा मोठा प्रश्न झोरे यांना पडला आहे.
शित्तूर-वारुण परिसरातील डोंगररांगांना आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अज्ञातांकडून लावण्यात येत असलेल्या आगीमुळे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.
फोटो:
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी राघूचा धनगरवाडा येथील ठकू झोरे यांची जळून खाक झालेली वैरण. (छाया : सतीश नांगरे)