दंडवते वसाहत परिसरात शेतकऱ्यांनी गवत, पिंजराच्या गंजी घातल्या होत्या. शनिवारी दुपारी त्यांना अचानक आग लागली. शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कागल नगरपालिकेच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत गवत गंजी पूर्णपणे जळाल्या होत्या. यामध्ये निवृत्ती कृष्णा दंडवते, सुरेश शिवराम दंडवते, शशिकांत शिवराम दंडवते, आनंदा शिवराम दंडवते, रवींद्र बळवंत पाटील, बाबासो शामराव आगळे, आदी शेतकऱ्यांच्या गवत गंजी जळाल्याने त्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी सरपंच छाया सुतार, उपसरपंच शरद पाटील, पोलीस पाटील भगवान पाटील, मर्दाने, एम. टी. पोवार व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
फोटो ओळी ः व्हनाळी येथे गवत गंजींना आग लागल्याने झालेले नुकसान. छाया : जगदीश वाडकर, व्हनाळी.