कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर इतर सभापतींनी २० दिवसांनी राजीनामा देण्याचे पहिल्याच निवडीवेळी ठरविण्यात आले होते. त्यामुळे अगोदर अध्यक्षांचा राजीनामा घ्या मगच आमच्या राजीनाम्याचे बघू, अशी भूमिका कांही पदाधिकाºयांनी घेतल्याने सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत. पदाधिकारी बदलांबाबत आज, शनिवारी दुपारी ३ वाजता सत्तारूढ आघाडीतील विविध पक्ष आणि आघाड्यांची बैठक होणार आहे. शासकीय विश्रामगृहावर होणाºया या बैठकीला ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे मात्र उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.विद्यमान पदाधिकाºयांना सुखासुखी पद सोडायचे नाही. त्यामुळे हा विषय जेवढा लांबेल तेवढा त्यांच्यासाठी तो फायद्याचा आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांना जूनमध्ये सव्वा वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, पाठिंबा दिलेल्या पक्ष आणि आघाडी नेत्यांना एकत्र आणण्याचे निश्चित केले आहे. परंतु, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ठोस भूमिका घेतल्याशिवाय पदाधिकारी बदल होण्याची शक्यता नाही. माजी आमदार महाडिक यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपद आपल्या सुनेकडेच कायम ठेवायचे आहे. आमदार अमल महाडिक यांचाही तसा आग्रह असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील हे देखील सहजासहजी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांच्याकडे राजीनामा मागायचा कुणी असाही प्रश्न आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्षांना मुदतवाढ देऊन फक्त अन्य चार पदाधिकारी बदलायचे झाल्यास आम्ही काय घोडे मारले आहे असा पवित्रा अन्य पदाधिकाºयांचा आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल करण्यात गुंतागुंतच जास्त आहे.भाजपकडे अध्यक्षपद असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचे आम्ही पाहतो, तुम्ही तुमच्या पक्षाचा, आघाडीचा निर्णय घेऊन टाका, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे विषय समिती पदांसाठीच्या इच्छुकांनीच पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार संजय घाटगे, प्रकाश आवाडे उपस्थित राहणार आहेत.‘जनसुराज्य’कडे बांधकाम समिती आणि समाजकल्याण समिती अशी दोन पदे आहेत. मात्र, ‘जनसुराज्य’च्या एका पदाधिकाºयांच्या घरचे मंगलकार्य असल्याने विनय कोरे यांच्यासह अनेक मंडळी तिकडे जाणार आहेत. त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत असा निरोप त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.विद्यमान पदाधिकाºयांची ठरल्याप्रमाणे २० जूनला मुदत संपत असली तरी आतापासूनच इच्छुकांनी वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. ऐनवेळी विषय निघून वेळ जाण्यापेक्षा आताच काय ते ठरवायची भूमिका या इच्छुकांनी घेतली आहे. सत्तारूढ आघाडीतही अंतर्गत धुसफूस आहे. त्यामुळे बदल करताना कांही दगाफटका झाला तर सत्ता जायला नको अशी नेत्यांची भूमिका आहे.पालकमंत्र्यांनी मनावर घेतले तरचपालकमंत्री पाटील यांनी मनावर घेतले तर बदल शक्य आहे. परंतु त्यांचे सध्याचे टार्गेट कोल्हापूर महापालिकेतील सत्ताबदल हे आहे. त्यामुळे त्यांच्या अजेंड्यावर जिल्हा परिषदेतील बदल सध्यातरी नाही. जिथे सत्ता नाही तिथे मिळवणे हे त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचा आहे. पालकमंत्री हे महाडिक यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे शौमिका महाडिक यांचा राजीनामा संभवत नाही. पहिल्यावर्षी अरुण इंगवले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली असती आणि शौमिका महाडिक या पदाच्या दावेदार असत्या तर इंगवले यांचा राजीनामा मुदतीत घेतला असता. परंतु आता इंगवले हे दावेदार आहेत व त्यांना अध्यक्ष करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांचाच फक्त आग्रह आहे. त्यामुळे या घडामोडींना राजकीय ताकद कमी पडत आहे.एकट्याचीही निवड शक्य..जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही एका पदाधिकाºयांने राजीनामा दिल्यास त्याचीही निवड करता येते. प्रत्येक पदाधिकाºयांने स्वतंत्र अर्ज भरून त्यांची निवड झालेली असते त्यामुळे त्या पदाधिकाºयांनी राजीनामा दिल्यास प्रशासन रिक्त पदाची माहिती जिल्हाधिकाºयांना पाठविते व त्यांच्याकडून नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जातो, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
आधी अध्यक्षांचा, मगच आमचा राजीनामा--जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:36 AM
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर इतर सभापतींनी २० दिवसांनी राजीनामा देण्याचे पहिल्याच निवडीवेळी ठरविण्यात आले होते.
ठळक मुद्देघटक पक्षांच्या नेत्यांची आज बैठक; सत्तारूढ गटाच्या अडचणी वाढणार