कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीं पोलिसांनी जप्त केल्या होत्या, त्या पूर्ववत मालकाला परत देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू केली. दुचाकी परत हवी असल्यास प्रथम कोरोनाची जागीच अँटिजन चाचणी बंधनकारक केले. त्यामुळे दुचाकीमालकांची शहर वाहतूक शाखेच्या आवारातच अँटिजन चाचणी करूनच दंड आकारून ती ताब्यात दिली जात होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सव्वा महिन्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींना कायद्याचा दंडुका दाखविला. दि.१५ एप्रिल ते २३ मेपर्यंत शहरात सुमारे २४८५ दुचाकी वाहने जप्त केली. त्यापैकी २८६ दुचाकी कडक लॉकडाऊनच्या आठवड्यात आहेत. जप्त वाहने सोमवारपासून मालकांना परत देण्याची कार्यवाही शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सुरू केली. त्यामुळे दुचाकी नेण्यासाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर प्रचंड रांग लागल्या होत्या.दुचाकीमालकाची गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचे बॉक्स आखले. मालकाचे हात प्रथम सॅनिटायझरींग करूनच त्याला आवारात घेतले जात होते. मास्क तपासून दक्षता म्हणून तेथेच ह्यअँटिजनह्ण चाचणी घेण्यात येत होती. त्यानंतर दुचाकीची कागदपत्रे तपासून दंड भरून टोकन दिले जात होते. टोकन घेऊन मेन राजाराम हायस्कूलच्या आवारातून दुचाकी ताब्यात दिली जात होती.