संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगांव : आघाडी सरकारची राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून सध्याच्या भाजप सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजना सुरू केली. याअंतर्गत राज्यातील पहिली मुख्यमंत्री पेयजल योजना शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावात मंजूर करण्यात आली. यासाठी एक कोटी २० लाखांची तरतूदही करण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या योजनेच्या कामाला शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे तमदलगेमध्ये नोव्हेंबरपासून पाणीटंचाई भासू लागली आहे.तमदलगे हे दुष्काळी गाव असून, गावाला विहिरीतून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पावसाने पाठ फिरविल्याने यंदा पाझर तलावानेही तळ गाठल्याने विहिरी व कूपनलिकांनाही पाणी कमी पडत आहे. अशा गावातच मुख्यमंत्री पेयजलअंतर्गत राज्यातील पहिली योजना मंजूर केली. त्यासाठी एक कोटी २० लाखांची तरतूद केली. अनिल कमते यांना या कामाचे टेंडरही मिळाले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे गेल्या चार वर्षांत या पेयजल योजनेचे काम सुरूही झालेले नाही. ही योजना वारणा नदीतून असून, ९ किलोमीटवरील कोथळी येथील बंधाऱ्यातून पाणी उपसा होणार आहे; पण कामच रखडल्याने वारणेचे मुबलक पाणी मिळून दुष्काळी गावाचा शिक्का कधी पुसणार याकडे तमदलगेकरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या योजनेचे काम तत्काळ सुरू करण्याची गरज आहे.ही आहे तांत्रीक अडचणया योजनेच्या टेंडरच्या वर्कआॅर्डरचे काम झाले आहे. मात्र, पाईपचा आयरॉस कोड बदलण्यात आला. ही पाईप सध्या बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे ठेकेदारांने नवीन पाईपची मागणी केली आहे. मात्र, या पाईपच्या तांत्रिक अडचणीमुळे गावची योजना मात्र रखडली आहे.‘भाजप’चा दिखाऊपणाआघाडी सरकारची राष्ट्रीय पेयजल योजना रद्द करून भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन मुख्यमंत्री पेयजल योजना सुरू केली आहे. मात्र, चार वर्षांपासून तांत्रिक अडचण समोर दाखवून राज्यातील पहिली योजना मंजूर केलेल्या तमदलगेला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे भाजपचा दिखाऊपणा समोर आला आहे.
राज्यातील पहिली मुख्यमंत्री पेयजल योजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:55 PM