महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी ही माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या सूचनांनुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. महापालिका हद्दीकरिता एक टास्क फोर्स निर्माण करण्यात आलेला आहे. त्याद्वारे डाटा तयार करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना योद्धा अशा १४४४ व्यक्तींची यादी तयार झाली आहे तसेच आघाडीवर काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या ५३०० कर्मचारी व खासगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ८०१० कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
सर्व व्यक्तींचे नाव, पत्ते, त्यांचे काम याची सर्व माहिती संकलित झाली आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा प्राधान्याने या १४ हजार ७५४ व्यक्तींना लस टोचली जाणार आहे. त्यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. महापालिकेची सर्व तयारी मात्र झाली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.