कोल्हापूर : सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठातील अॅथलेटिक ट्रक्सवर आर्मी रिक्रुटमेंट आॅफिस व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या भरतीवेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधाला. दोन दिवस चाललेली ही भरती सोल्जर ट्रेडस्मन या पदासाठी आहे. मंगळवार (दि. १३) पासून सकाळी सहा वाजल्यापासून भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरती झाली असून, पहिल्या दिवशी ४ हजार ४०० उमेदवार भरतीसाठी उतरले होते. पहिल्यांदा या सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बोगस कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागातील काही कर्मचार्यांची त्यांनी मदत घेतली आहे. उमेदवारांची धावणे, शारीरिक चाचणी, वजन, उंची मोजली. यातून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांची बुधवारी (दि. १४) वैद्यकीय चाचणी होणार आहे.
पहिल्या दिवशी साडेचार हजार उमेदवार सैन्यभरती : भरतीबाबत भूलथापांना बळी पडू नका : कौशल
By admin | Published: May 14, 2014 12:49 AM