कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज, शनिवारी सूर्यकिरणांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. ढगाळ वातावरणामुळे काहीशी तांबूस किरणे सायंकाळी सव्वासहा वाजता चरणस्पर्श करून वर सरकली. किरणोत्सवाला आज, शनिवारपासून प्रारंभ झाला. पूर्वी किरणोत्सव पाच दिवस व्हायचा. आता तीन दिवस पाहिला जातो. महाद्वारातून थेट गाभाऱ्यात किरणे पोहचतात. आज सायंकाळी ६ वाजून २ मि. कासव चौकातून किरणांनी एक-एक पायरी पूर्ण करीत सव्वासहा वाजता मूर्तीचा चरणस्पर्श केला, अशी माहिती ‘केआयटी’चे प्राध्यापक हिरासकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी ‘चरणस्पर्श’
By admin | Published: February 01, 2015 1:05 AM