शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सलग दुसऱ्या वर्षी जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:15 AM

कोल्हापूर : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा काेरडाच जात ...

कोल्हापूर : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा काेरडाच जात आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून मोठ्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लागले आहेत. त्यानंतर मात्र अगदी महापूर येईपर्यंत पाऊस कोसळण्याचा मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता सर्वांच्या मनात आतापासून भीती दाटू लागली आहे.

जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांतील जून-जुलैमधील पावसाचा अंदाज घेतला तर या तीनही वर्षी माॅन्सूनने वेळेत आगमन केल्याचे दिसते. २०१९ मध्ये तर पावसाने जूनमध्येच सुरू केलेला रपाटा ऑगस्टअखेरपर्यंत सुरूच राहिला होता. या तुलनेत गेल्या वर्षी २०२० मध्ये जूनमध्ये पावसाने आगमन केले, पण त्यानंतर जी दडी मारली ती २५ जुलैपर्यंत पावसाने प्रतीक्षा करायला लावली. आता चालू वर्षीदेखील माॅन्सूनने जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच जोरदार बॅटिंग केली, त्यानंतर तो पाऊस गायब झाला आहे, तो अद्याप परतलेलाच नाही. अधेमधे एखादं दुसऱ्या किरकोळ सरी येतात, पण त्यात जोर नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा पिकांना लागली आहे.

पहिल्या पंधरवड्यात गेल्या दोन वर्षांत सरासरी केवळ ५० ते १०० मिलिमीटर असा किरकोळ पाऊस पडला आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या पंधरवड्यात सरासरीच्या दुप्पटीने पाऊस पडल्याचे दोन वर्षांचे आकडे सांगतात. गेल्या वर्षी २५ जुलैनंतर परतलेल्या पावसाने महिनाअखेरपर्यंत तब्बल ७७२ मिलिमीटर इतक्या तुफानी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पुढे वाढतच गेल्याने २०१९ प्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठड्यात महापूर आला. २०१९ मध्ये देखील असाच २० जुलैनंतर पाऊस सुरू झाला होता आणि अवघ्या दहा-बारा दिवसांच्या पावसात जिल्ह्यात महापूर आला होता. या वर्षीदेखील तशीच चिन्हे दिसत आहेत. कारण आता तरणा पाऊस असाच तुरळक जाणार असून, २० नंतर सुरू होणाऱ्या म्हाताऱ्या नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाला जोर चढणार आहे.

जुलैच्या पहिल्या पंधवड्यापर्यंत पडलेला पाऊस

वर्ष पाऊस (मिलिमीटरमध्ये)

२०१९ ४३७

२०२० २००

२०२१ ४०६ (आतापर्यंत)

चौकट

पीक-पाणी उत्तम; पण भीती महापुराची

२०१९ मध्ये सातत्याने पाऊस पडल्याने पेरण्यांही अडकल्या होत्या. ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील पेरण्याच झाल्या नाहीत. ज्या झाल्या त्या महापुराच्या तडाख्यात कुजून गेल्या. यावर्षी आतापर्यंत ८० टक्केपर्यंत पेरण्या झाल्या असून पिकेही तरारली आहेत. फक्त आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने त्याची वाढ खुंटली आहे. आता एकसारखा पाऊस सुरू झाला तर मात्र २०१९ सारखी पूरस्थिती निर्माण होऊन पीक धोक्यात येणार आहे.

चौकट

आता १५ पासून पाऊस जोर धरणार

पावसाने दीर्घकाळ दडी मारली असलीतरी उद्यापासून वादळाच्या स्वरूपात पाऊस पुनरागमन करेल आणि या महिनाअखेरपर्यंत मुक्काम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता कोरडे वाटणारे शेतशिवार या महिनाअखेर पाण्याने तुडुंब होणार आहे. हा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग बरसणार आहे. त्यानंतर पुढे दहा-बारा दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा असल्याने त्याअनुषंगाने शेतीकामाचे नियोजन करण्याची गरज आहे.

चौकट

दिवसभर पावसाची हुलकावणी

गुरुवारी किरकोळ स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज होता; पण दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचा असल्याने आज शुक्रवारी तहानलेल्या पिकांना थोडाफार दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.