लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील पहिल्या सर्वांत मोठ्या शासकीय पशुखाद्य कारखान्याची कोल्हापुरात निर्मिती करणार असल्याची घोषणा दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी येथे केली. दुधाचे बिल महिलेच्या नावावर जमा करण्याचा कायदा करण्यात आला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
क्रशर चौक येथील केदारनाथ हॉल येथे राष्टÑीय समाज पक्षा (रासप)च्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, जिल्हा संपर्कप्रमुख मुकुंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. बाळासाहेब कामण्णा, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खोंद्रे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शुभांगी चितारी, जिल्हा युवक अध्यक्ष सागर साळोखे, आदींची होती.
मंत्री जानकर म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील आपली स्थिती काय आहे? आपण किती जागा जिंकलो, याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आतापर्यंत नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पक्षाचा चंचुप्रवेश होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. यामध्ये आपण कुठे तरी कमी पडलो हे लक्षात घेतले पाहिजे. आता नव्याने शून्यापासून तयारी करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना मजबूत करून ताकद वाढविण्यासाठी कामाला लागावे. हे करीत असताना आपल्याला झेपेल इतकेच काम हातात घ्या. पक्षाची ताकद वाढली तरच तुमची दखल घेतली जाईल, हे ध्यानात ठेवा.
ते पुढे म्हणाले, गाय, म्हैस, कोंबड्यांना चांगले व दर्जेदार खाद्य मिळावे, यासाठी राज्यातील पहिला शासकीय पशुखाद्य कारखाना कोल्हापुरात उभा करण्यात येणार आहे. दूध उत्पादक महिलेच्या नावावर दुधाचे बिल थेट जमा करण्याचा कायदा करण्यात आला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. ‘जलयुक्त शिवार’च्या धर्तीवर मस्त्यशेतीसाठी १४ हजार कोटींची नीलक्रांती योजना आणली आहे. यंदा पशुसंवर्धन खात्याचे ६ हजार ५०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येकी १० लाख युवक व युवतींना मत्स्योद्योगासाठी मदत होणार आहे.
डॉ. कचरे यांनी गेल्या दीड वर्षातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत महापालिका निवडणुकीत १५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करून जिल्ह्णाच्या राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले. आगामी काळात ग्रामपंचायत व हुपरी नगरपालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.कामण्णा यांनी जिल्ह्यात पक्षाची स्थिती आता चांगली झाली असून, ग्रामीण भागात पक्ष वाढत असल्याचे सांगितले.
मुकुंद पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात राजकीय पार्श्वभूमी नाही अशा कार्यकर्त्याला नेतृत्व देण्याचे काम या पक्षाने केले आहे. डॉ. एस. डी. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दीपाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शिरोळ तालुकाध्यक्ष संजय वैद्य यांनी आभार मानले.अधिकाºयांकडे माहितीअधिकाराचा अर्ज टाकू नका‘रासप’च्या कुठल्याही कार्यकर्त्याने शासकीय अधिकाºयांकडे माहिती अधिकाराचा अर्ज टाकून त्यांना धमकावू नये, अशी विनंती करीत आतापर्यंत माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याने असा प्रकार केला नसल्याबद्दल मंत्री जानकर यांनी समाधान व्यक्त केले.लवकरच ‘पशुसंवर्धन’चे ‘अॅप’पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर हे स्वत: जागेवर भेट देऊन जनावरांची तपासणी करण्याऐवजी दुसºयाच कुणाला तरी पाठवितात. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टर प्रत्यक्ष जागेवर जातात का नाही? याची खातरजमा करण्यासाठी लवकरच ‘अॅप’ तयार करण्यात येणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. तसेच या खात्यातील डॉक्टरांच्या बदल्या पुढील वर्षीपासून आॅनलाईन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २५ आमदारनिवडून आणण्याचे ध्येयआगामी काळात राज्यात पक्षाचे २५ आमदार व दोन खासदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी नुसते बोलून चालणार नाही, तर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे, असे मंत्री जानकर यांनी सांगितले.फुकटची पदे घेऊन त्यांचा वापर फक्त लेटरपॅड व व्हिजिटिंग कार्ड छापून शायनिंग मारण्यासाठी करू नका, एकवेळ पक्ष वाढला नाही तरी चालेल; पण असे काही करू नका, असेही त्यांनी सांगितले.