शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती.खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून, ती शेतकºयांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणाºयांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करून माझ्यामुळेच शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकºयांसाठी लढलो असून, त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मागितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकºयाला असून, कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.देशात सरासरी २३५ ते २४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र, गरज २५० ते २६० लाख मेट्रिक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार ९.५ टक्के साखर उताºयासाठी २५५०, १२ टक्क्याला ३२२० आणि १३ टक्क्याला ३४८६ असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १२.५० टक्के साखर उताºयामुळे ३४०० रु.चा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक ३०० रुपये असा दर कारखानदारांनी द्यावा, असे आवाहनही केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार ७०:३० हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकºयांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल, तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले.स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतीश वुरुलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधव आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक, आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा ५० लाख शेतकºयांना लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच २०१८ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड करणाºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे.पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात, आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाºयांनी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला, असा सवालही खोत यांनी केला.वजनकाट्यांची तपासणी करणारराज्यातील अनेक साखर कारखाने काटा मारत असल्याच्या तक्रारी नियमित होत असतात. त्यामुळे यंदा मंत्री गिरीष महाजन यांना सांगून राज्यातील सर्व कारखान्यांच्या काट्यांवर छापे मारून अचानकपणे त्यांची तपासणी करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पणसंघटनेच्यावतीने शेतकºयांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याला अँड्राईड मोबाईलवर सक्रिय केल्यास शेतकºयांना हवामानाचा अंदाज व बाजारभाव यासह आवश्यक माहिती, तसेच राज्य कृषिमंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत. या अ‍ॅपचे लोकार्पणही या कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते केले.