बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे जाहीर केले.येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कारखान्यांनी उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यावी व त्यानंतर जो नफा मिळेल तो ७०:३० च्या सूत्रानुसार द्यावा असे कायदेशीर धोरण निश्चित करण्यात आले आहे.जेव्हा कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले राष्टÑीयीकृत बँकांमधून डाटा चुकीचा आल्याने काही प्रमाणात कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात येण्यास विलंब होत आहे; मात्र काही लोक त्यावरुन अकांडतांडव करीत आहेत. त्यातून कोणाचे भले होणार नाही. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, रस्त्यांच्या कामासंबंधी जीएसटीच्या समावेशाने टेंडर भरण्यास ठेकेदारांनी विलंब केला आहे. त्यामध्ये सुधारणा झाली असून, अवेळी पडत असलेला पाऊस यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल.
एफआरपी द्यायला कारखान्यांकडे पैसे नव्हते तेव्हा राज्य सरकारने मदत केली. एफआरपीबाबत कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळे हंगाम सुरू करताना एफआरपी व नंतर ७०:३० च्या सुत्रानुसार अंतिम दर देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे धोरण एकदा निश्चित झाले असताना काही लोक वाहनांचे टायर पेटवणे, कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही असा इशारा देत आहेत. परंतू ते दिवस आता गेले आहेत. ठरलेल्या सुत्राप्रमाणे यंदाही शेतकºयांच्या उसाला चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला आहे.’- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री