कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात उभारणी करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.
सदर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. त्या वसतिगृह इमारतीची पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, या वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जातील. याठिकाणी दि. २६ जुलैपर्यंत मुले प्रत्यक्ष राहण्यास येतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.
या वसतिगृहाच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, उद्योगपती चंद्रकांत जाधव, सुरेश पाटील, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, शिरीष जाधव, आदी उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या नव्याने विकसित केलेल्या वसतिगृह इमारतीची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत कर्जासाठीच्या अर्जदारांना बँका प्रतिसाद देत नाही. या बँकांना जिल्हाधिकाºयांनी सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलीप पाटील यांनी यावेळी दिला.दृष्टिक्षेपात वसतिगृह..विद्यार्थीक्षमता ७२सुरुवात २६ जुलैपासूनप्रवेशासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे नावनोंदणी करावसतिगृहात विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्रसदर बाजारमधील दुरवस्था झालेल्या अन्य निवासस्थानांची दुरुस्ती करणारकोल्हापुरातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सदर बाजार येथे सुरू होणाºया वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. यावेळी शेजारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, बांधकाम अधिक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, आदी उपस्थित होते.