तासगाव : तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तासगाव टॅलेंट सर्च परीक्षा घेण्याचा निर्णय पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत झाला. तालुक्यातील सहा हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार असून, त्यासाठी ७५ हजार रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला.सभापती हर्षला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी गटविकास अधिकारी सतीश गाढवे, उपसभापती अशोक घाईल, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांच्यासह सदस्य आणि खातेप्रुमुख उपस्थित होते. गतवर्षी भुदरगड पॅटर्नची अंमलबजावणी करुन पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी हा पॅटर्न फायदेशीर ठरला. त्यामुळे यावर्षी तासगाव तालुक्याचा स्वतंत्र असा नावीन्यपूर्ण तासगाव टॅलेंट सर्च पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली आणि दुसरीच्या सहा हजार विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेसाठी पंचायत समितीच्या निधीतून ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. याबाबत आता सर्वच शाळांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. या टॅलेट सर्च परीक्षेमुळे विद्यार्र्थ्याची गुणवत्ता वाढणार आहे. (वार्ताहर)तासगाव शिक्षण विभागामार्फत तासगाव पॅटर्नसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पहिली आणि दुसरीतील शंभर टक्के विद्यार्थी या परीक्षेस बसविण्यात येणार आहेत. वर्षभरात दोन सराव चाचण्या घेण्यात येणार असून, मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरीला शिकवणाऱ्या शिक्षकांची २२ आणि २३ तारखेला कार्यशाळा घेण्यात येणार आहे.प्रदीप कुडाळकर, गटशिक्षण अधिकारी, तासगाव५० अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन तासगाव तालुक्यातील अंगणवाड्यांची औरंगाबाद येथील आयएसओ मानांकन समितीकडून पाहणी करण्यात आली होती. या समितीकडून ५० अंगणवाड्यांना आएसओ मानांकन मिळाल्याची माहिती सभापती हर्षला पाटील यांनी दिली. या अंगणवाड्यांच्या सेविका, मदतनीस यांच्या अभिनंदानाचा ठरावही यावेळी करण्यात आला.
पहिली, दुसरीसाठी टॅलेंट सर्च परीक्षा
By admin | Published: September 29, 2015 9:49 PM