शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शिवसेनेकडून प्रथमच उमेदवार बदलाची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:29 AM

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघात गेल्या सात निवडणुकीची परंपरा खंडित करून शिवसेनेने प्रथमच सलग ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघात गेल्या सात निवडणुकीची परंपरा खंडित करून शिवसेनेने प्रथमच सलग दुसऱ्यांदा एकाच म्हणजे प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येकवेळा नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या धोरणांचा या पक्षाला कायमच फटका बसला आहे. हातकणंगले मतदारसंघातही तशीच स्थिती आहे. तिथेही यंदा वीस वर्षांनंतर प्रथमच एकाच कुटुंबातील पुढच्या पिढीस या पक्षाने उमेदवारी दिली आहे. लढविलेल्या सातपैकी पाच लढतीत शिवसेना दुसºया क्रमांकावर राहिली आहे.कोल्हापूरच्या राजकारणावर कायमच काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव राहिला; परंतु बंडखोर प्रवृत्ती या जिल्ह्याच्या मातीचाच गुण आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून शेका पक्षासह अन्य डाव्यांचा प्रभाव या जिल्ह्यांवर अनेक वर्षे राहिला. तो कमी झाल्यावर ही जागा उजव्या विचारांच्या शिवसेनेने घेतल्याचे दिसते. राज्याच्या राजकारणातही साधारणत: सन १९९० च्या दशकांनंतर शिवसेनेची हवा सुरू झाली. त्यानंतरच्या सन १९९१ पासून सन २०१४ पर्यंत लोकसभेच्या सात निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका शिवसेनेने ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर लढविल्या परंतु या पक्षाला आतापर्यंत एकदाही विजयाला गवसणी घालता आलेली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण असे की प्रत्येकवेळा या पक्षाने ऐनवेळी आणि नवीन उमेदवारास संधी दिली. या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके व आमदार प्रकाश आबिटकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हीच बाब प्रकर्षाने निदर्शनास आणून दिली व मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.आतापर्यंत रामभाऊ फाळके, त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रमेश देव, कागलच्या शाहू समूहाचे प्रणेते विक्रमसिंह घाटगे, मेजर जनरल शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक, विजय देवणे आणि मागच्यावेळी संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. यातील एकही उमेदवार पक्षाचा मूळ कार्यकर्ता नाही. देवणे यांना जिल्हा प्रमुख असताना उमेदवारी दिली असली तरी ते मूळचे शेकापक्षाचे कार्यकर्ते होते. देवणे आणि मंडलिक वगळता इतर सर्वजण निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर शिवसेनेपासून बाजूला गेले. विक्रमसिंह घाटगे यांची शिवसेनेची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यावर शरद पवार यांनी उदयसिंहराव गायकवाड यांना थांबवून घाटगे यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना रिंगणात उतरविले. लोकसभेच्या सन २००४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयापर्यंत पोहोचले होते परंतु बिंदू चौकात पवार यांनी ‘कौन हैं यह मुन्ना...कहाँ से आया हैं..’ अशी बोचरी टीका केली व हसन मुश्रीफ यांनी शेवटच्या तीन दिवसांत केलेल्या जोडण्या उपयोगी पडल्या व मंडलिक यांचा निसटता विजय झाला. घाटगे किंवा महाडिक हे पराभवानंतरही शिवसेनेची एकनिष्ठ राहिले असते तर ते खासदारच नव्हे तर केंद्रात मंत्रीही झाले असते. हीच स्थिती हातकणंगले मतदार संघातही दिसते. तिथेही प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. लोकसभेची सन १९९८ ची निवडणूक श्रीमती निवेदिता माने यांनी शिवसेनेकडून लढवली व त्यांचा १२,१९४ मतांनी पराभव झाला. संजय पाटील यांनीही चांगली मते घेतली. गेल्या निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राजू शेट्टी यांच्या वाट्याला गेल्याने युतीचा उमेदवार रिंगणात नव्हता.शिवसेनेचे गठ्ठा मतदानदोन्ही मतदारसंघांत ‘धनुष्यबाण’ हाच आपला उमेदवार समजून त्यास मतदान करणारा किमान एक लाखाचा गठ्ठा या पक्षाकडे आहे म्हणून तर सन १९९१ ला प्रा. विष्णूपंत इंगवले यांच्यापेक्षा रामभाऊ फाळके यांना तर सन १९९६ ला प्रा. एन. डी. पाटील यांच्यापेक्षा रमेश देव यांना जास्त मते मिळाली आहेत. स्वत:चा मजबूत गट असणारा उमेदवार मिळाला की शिवसेना निवडणुकीत हवा निर्माण करते, असा इतिहास व या निवडणुकीत काहीसे तसेच वातावरण आहे.कोल्हापूर मतदारसंघातीलशिवसेनेचे आतापर्यंतचे उमेदवारसन ११९१ : रामभाऊ फाळके : मते ७५,१७७सन १९९६ : रमेश देव : १,६८,४१४सन १९९८ : विक्रमसिंह घाटगे :३,०६,३५३सन १९९९ : मेजर जनरल शिवाजीराव पाटील : १,६३,८६६सन २००४ : धनंजय महाडिक : ३,८७,१६९सन २००९ : विजय देवणे : १,७२,८२२सन २०१४ : प्रा. संजय मंडलिक : ५,७४,४०६