राहुल मांगुरकर -- अर्जुनवाड(ता. शिरोळ) या गावाने जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात एक आदर्श दाखवून तंटामुक्ती अध्यक्षपद हे महिलेच्या हाती देऊन आदर्शवत काम केले आहे. या पदासाठी प्रत्येक गावात रस्सीखेच सुरू असते. मात्र, अर्जुनवाड गावाने एक नवी दिशा देऊन राजश्री चौगुले यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड केली. येथे २ आॅक्टोबरला ग्रामसभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली होती. मात्र, ती सभा झाली. अध्यक्षस्थानी मावळते तंटामुक्त अध्यक्ष व विद्यमान सरपंच नंदकुमार पाटील होते. प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. सभेपुढे २६ विषय ठेवले होते व त्या २६ विषयांना मंजुरी देण्यात आली.दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय काही पदधिकांऱ्यानी आहे तसा चालढकलीवर नेण्याचा प्रयत्न केला, पण जागरूक ग्रामस्थांनी व सरपंचांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद बदलण्याच्या मागणीवर जोर धरला. त्यावर माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह १४ पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. चौदा मातब्बर माजी सरपंचांसह नेतेमंडळींनी अर्ज दाखल केले होते, पण काही ध्येयवादी नागरिकांनी एक धोरणात्मक विचार करून स्वाभिमानी संघटनेच्या राजश्री चौगुले यांची गावच्या तंटामुक्त अध्यक्ष समितीवर बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. ग्रामपंचायतीवर शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या व पक्षांतर्गत गटाची सत्ता असताना शिवाय यापूर्वीही तंटामुक्ती समितीचे कामकाज चांगले असूनही महिलेस संधी देण्यात आली आहे. प्रभारी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे, ग्रामपंचायत सदस्य जयवंती बानुसे, मीनाश्री कोरे, अश्विनी झाबळे, शिवाजी म्हैसाळे, सुनील कांबळे, गजानन करे, विलास पाटील, जिनेंद्र चौगुले, सुदर्शन परीट, राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदीप चौगुले, संजय यादव, संतोष पाटील, मंगेश देसाई, संदीप खोत उपस्थित होते. समितीमध्ये विक्रमी ८४ सदस्यनुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजयाचा बदला घेतल्याची ग्रामस्थांतून चर्चा होत आहे. गावाच्या इतिहासात प्रथमच गावसभेला २६ विषय ठेवण्यात आले होते. याविषयी तंटामुक्त अध्यक्ष निवडीवर लक्ष केंद्रित केले होते. तंटामुक्ती समितीमध्ये विक्रमी ८४ ग्रामस्थांचा सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे.
‘तंटामुक्ती’च्या अध्यक्षपदी प्रथमच महिला
By admin | Published: October 12, 2015 10:51 PM