पोलीस निरीक्षक गिरी यांनी सांगली, मुंबई येथे निरीक्षक पदावर काम केले आहे. याशिवाय पो. नि. भैरू अंतू तळेकर यांची चंदगड येथे, पो. नि. श्रीकांत पिंगळे यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच सहा. पो. नि. दिनेश काशीद यांची गडहिंग्लजहून कोडोली, स. पो. नि. प्रमोद सुर्वे यांची पन्हाळ्याहून कळे पोलीस ठाण्यात बदली झाली.
इतर बदली झालेले अधिकारी व बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे : सपोनि सागर पाटील- शाहूपुरी, प्रवीण पाटील-हातकणंगले, विश्वास पाटील-राधानगरी, संजय हारूगडे-गडहिंग्लज, आरती नांद्रेकर- जुना राजवाडा, दीपक वाकचौरे-कागल, पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री अनुराधा पाटील-राधानगरी, तृप्ती चव्हाण- चंदगड, सीमा बडे-हातकणंगले, तेजश्री पवार-इचलकरंजी, शरद माळी-गडहिंग्लज, सतीश मयेकर-भुदरगड, रमेश ठाणेकर- शाहूवाडी, यशवंत उपराटे-हातकणंगले, इकबाल महात-शिवाजीनगर, चंद्रकांत भोसले-वडगाव, विलास भोसले-आजरा, अनिल शिरोळे- राजारामपुरी, सोमनाथ वाघमोडे- लक्ष्मीपुरी, अमित पाटील- कुरुंदवाड, सागर पवार-कोडोली, संदीप जाधव-जुना राजवाडा, विजय मस्कर-हुपरी, कुमार ढेरे-मुरगूड, नागेश खैरमोडे-राजारामपुरी.
इंगवले निलंबित, ओमासे, बनसोडेंचे उचलबांगडी
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका तीन पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवून त्यांच्या नियंत्रण कक्षाला बदल्या केल्या. कळे पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. श्रीकांत इंगवले यांना एक दारूप्रकरणी निलंबित करून त्यांची बदली नियंत्रण क़क्षाकडे केली. पो. नि. ईश्वर ओमासे यांची शिवाजीनगरहून तर स.पो.नि. सूरज बनसोडे यांची कोडोली येथून उचलबांगडी करून त्यांची नियंत्रण कक्षाकडे बदली केली.
(तानाजी)- स्नेहा गिरीचा फोटो भरत बुटालेंकडे आहे...