शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:31 PM

कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले.

ठळक मुद्देभोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेरधरणक्षेत्रात जोरदार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले.ह्यनिसर्गह्ण चक्रीवादळामुळे गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (दि. ४) दिवसभर त्याने काहीशी विश्रांती घेतली. मात्र रात्रीपासून पावसाने रिपरिप सुरू केली. शुक्रवारी सकाळी तर जोरदार पाऊस कोसळला.

अनेक ठिकाणी तर मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसाने खरीप पेरणी झालेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहेच; त्याशिवाय असाच पाऊस राहिला तर पेरण्या अडचणीत येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.राधानगरी धरणात ४४.७९ दलघमी पाणीसाठा, कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४४.७९  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७  वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये  पाणीसाठा 

  • तुळशी ४७.१७ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २१०.७६ दलघमी, कासारी २४.१८ दलघमी, कडवी ३१.०१ दलघमी, कुंभी २७.६६ दलघमी, पाटगाव २३.९८ दलघमी, चिकोत्रा १३.८७ दलघमी, चित्री १३.०५  दलघमी, जंगमहट्टी ८.०५ दलघमी, घटप्रभा  १३.९५ दलघमी, जांबरे ६.११ दलघमी, कोदे (ल पा) १.२३ दलघमी असा आहे.

  बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

  • राजाराम १२.९ फूट, सुर्वे १४.२ फूट, रुई ४०.६ फूट, तेरवाड ३५ फूट, शिरोळ २७.६ फूट, नृसिंहवाडी २०.६ फूट, राजापूर १३.६ फूट तर नजीकच्या सांगली ६.६ फूट व अंकली ९.२  फूट अशी आहे.
टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर