कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरातील आणि राज्यातील पहिला विजय साकारण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. चंदगड वगळता जिल्ह्यातील ‘वंचित’चा झंझावात दिसलाच नाही. अन्य सात उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. हातकणंगलेत मात्र शिवाजी कांबळे या उमेदवाराने घेतलेल्या ११ हजार मतांमुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पराभव चाखावा लागला.
वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील कागलची एकमेव जागा वगळता उर्वरित सर्व नऊ जागा स्वबळावर लढविल्या. चंदगडमधून अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने ‘वंचित’ची उमेदवारी खांद्यावर घेतली. प्रस्थापित उमेदवारालाच ‘वंचित’ने जवळ केल्याने टीकाही झाली होती; पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत विजयाची हवा तयार केली.चौदाव्या फेरीपर्यंत पाच ते १२ हजार अशा मताधिक्याने विजयाकडे कूच करणाऱ्या अप्पी पाटील यांना १५व्या फेरीत मात्र धक्का बसला. १९८० मतांची आघाडी घेऊन राजेश पाटील पुन्हा शर्यतीत आले. चंदगड पट्ट्याची मतमोजणी सुरू झाल्यानंतर राजेश पाटील व शिवाजी पाटील यांच्यात शर्यत सुरू झाली आणि अप्पी पाटील तिसºया क्रमांकावर आले. राजेश पाटील यांनी शर्यत जिंकली असली तरी ‘वंचित’च्या माध्यमातून अप्पी पाटील यांनी सर्वांचेच आडाखे चुकवत मारलेली मुसंडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.--------------------------------------------‘वंचित’चा प्रभाव ओसरलालोकसभेला ‘वंचित’ने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत घेतलेल्या लक्षणीय मतांनी प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती. विधानसभेलाही तोच पॅटर्न पुढे ठेवला जाईल, असे भाकीत वर्तविले जात होते; पण वंचित आघाडीतील अंतर्गत व कुरघोड्यांमुळे वंचित प्रमुख शर्यतीमधून बाहेर पडून ती ‘वंचित’ऐवजी किंचित कधी झाली, ते त्यांनाही कळले नाही. अप्पी पाटील यांनी ४३ हजार मते घेतली; पण त्यात त्यांचा वैयक्तिक करिश्मा जास्त आहे.-------------------------------------------------मिणचेकर यांची हॅट्ट्रिक ‘वंचित’ने रोखलीहातकणंगलेतील उमेदवार शिवाजी कांबळे यांनी घेतलेली ११ हजार २०७ मते वगळता अन्य उमेदवार पाच ते सहा हजारांच्या आतच राहिले. हातकणंगलेमध्ये मात्र ‘वंचित’ने घेतलेल्या मतामुळे आमदार सुजित मिणचेकर यांची हॅट्ट्रिक रोखली गेली हे मात्र निश्चित. काँग्रेसकडून विजयी झालेले राजूबाबा आवळे आणि पराभूत उमेदवार सुजित मिणचेकर यांच्यातील मतांचा फरक अवघा साडेसहा हजारांचा आहे. लोकसभेलाही ‘वंचित’ने घेतलेल्या दीड लाख मतांमुळे ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांना पराभूत व्हावे लागले होेते.---------------------------------------------मतदारसंघ उमेदवार पडलेली मतेचंदगड अप्पी पाटील ४३ हजार ८३९राधानगरी जीवन पाटील ५६८०करवीर डॉ. आनंदा गुरव ५२००दक्षिण दिलीप कावडे २२१८उत्तर राहुल राजहंस ११५६शाहूवाडी डॉ. सुनील पाटील ४७००हातकणंगले शिवाजी कांबळे ११ हजार २०७इचलकरंजी शशिकांत आमणे ३६९३शिरोळ सुनील खोत ६१४५