शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

सांगलीत कार्यक्षेत्रातील पहिले उर्दू महाविद्यालय

By admin | Published: September 20, 2016 1:08 AM

देवानंद शिंदे : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येतील

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले उर्दू महाविद्यालय माझ्या कारकिर्दीत सुरू होत असल्याचा आनंद होत असून, या महाविद्यालयाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात येतील, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.सांगली येथील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या नवीन कला (उर्दू) महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाचे प्राथमिक संलग्नीकरण सोमवारी प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केवळ शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले उर्दू महाविद्यालय ठरले आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, उर्दू भाषेमधून शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनींना एक तर मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून पुढील उच्चशिक्षण घ्यावे लागत असे. तथापि, या महाविद्यालयामुळे त्यांना आता उर्दूतूनच पुढील शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष तथा महापौर हारुण शिकलगार यांना संलग्नीकरणाचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, सहायक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह संस्थेचे मानद सचिव हारुण इसहाक परांडे, संचालक इस्माईल बागवान व सांगलीचे माजी नगराध्यक्ष महंमदअली बागवान उपस्थित होते. (प्रतिनिधी)सांगलीमधील नवीन कला (उर्दू) महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाच्या प्राथमिक संलग्नीकरणाचे प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगली-मिरज-कुपवाडचे महापौर हारुण शिकलगार यांना प्रदान केले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, सहायक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे, आदीे.