वारणानगर : ३७ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीची गुणवत्ता राखण्यात येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती मिळवून पालक व विद्यार्थ्यांनी विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी केले.
येथील तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या ऋतुजा सदानंद गुरव (गुण ९१.३३) या विद्यार्थिनीचे व त्यांच्या पालकांचे अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, विविध विभागाचे प्रमुख, रजिस्ट्रार डी. एस. ठोंबरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व कमी पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिपूर्ण व गुणवंत अभियंता तयार करण्यासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असेल, असे सांगितले. वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांचे मार्गदर्शन मिळाले.
.................... ....................
फोटो ओळी : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम प्रवेश निश्चित करणाऱ्या ऋतुजा गुरव हिचे स्वागत प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी केले. सोबत ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, विभाग प्रमुख, रजिस्ट्रार.