शेंडा पार्क येथील स्वाधार नगरमधील पाच अंध, दिव्यांग असलेले कुष्ठरुग्ण हे गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असलेले बेड उपलब्ध होत नव्हते. त्यावर महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर घोरपडे यांनी या रुग्णांसाठी कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र बेडची व्यवस्था करून येथे त्यांना दाखल करून घेतले. त्यांच्यावर डॉ. संगीता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले. विशेष आहार उपलब्ध करून दिला. त्याच्या जोरावर या रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. या रुग्णांना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास फुलांचा वर्षाव आणि गुलाबपुष्प देऊन डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, व्हिजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे, मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर, बाबूराव दबडे, संग्राम मोरे, अमर भोसले, शाहू भोसले, हितेश ओसवाल, डॉ. अर्पिता खैरमोडे, आदी उपस्थित होते.
चौकट
रुग्णांना अश्रू अनावर
या सेंटरमधून डिस्चार्ज घेऊन बाहेर जाताना झालेल्या फुलांच्या वर्षावाने हे रुग्ण भारावले. त्यांना अश्रू अनावर झाले.
फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरुवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरुग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.
===Photopath===
200521\20kol_5_20052021_5.jpg~200521\20kol_6_20052021_5.jpg
===Caption===
फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरूवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरूग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.~फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरूवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरूग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.