शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निपाणीच्या तवंदी घाटात पुन्हा अपघात, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 6:46 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून ती सुरळीत होण्यास रात्र उलटेल, असा अंदाज आहे.

ठळक मुद्देनिपाणीच्या तवंदी घाटात पुन्हा अपघात, पाच जखमीदिवसभरात तीन अपघातात दहाजण जखमी

निपाणी/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानेमहामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून ती सुरळीत होण्यास रात्र उलटेल, असा अंदाज आहे.

या अपघाताने जानेवारीत झालेल्या भीषण अपघाताची आठवण ताजी झाली. या अपघातात सहाजण ठार झाले होते.दरम्यान, निपाणी घाटात आज दिवसभरात तीन वेगवेगळ्या अपघातात एकुण दहाजण जखमी झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात राजस्थानहून भरधाव वेगाने बंगलोरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकने (आरजे ४८ इए ५१२६) सांगलीकडे जाणाºया लाकूड वाहतूक करणाºया ट्रकला (एमएच१0 सीए ५२७७) जोरदार धडक दिली.राजस्थानच्या ट्रकने सांगलीकडे जाणाऱ्या ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की लाकूड वाहतूक करणारा हा ट्रक सर्व्हिस रोडवर विरुध्द दिशेला तोंड करुन उलटला. यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. दरम्यान, ज्या राजस्थानच्या ट्रकने धडक दिली, तो ट्रकही महामार्गावर विरुध्द दिशेला रस्त्याच्या मधोमध आडवा पडला. यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.या अपघातात राजस्थानच्या ट्रकमधील रणजित दास (वय ३५, रा. केरळ) सोनासिंग (वय २८, रा. राजस्थान), मोहंता चंगमई (वय ३८, रा. आसाम) हे पाजजण किरकोळ जखमी झाले आहेत तर सांगलीच्या ट्रकमधील गणपत वैष्णव (वय १८, रा. भिलवडी) आणि संजय वाळुंजेकर (वय ३0, रा. नगर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना निपाणीच्या महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आणखी दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजण जखमीदरम्यान, निपाणीजवळील हालसिध्दनाथ कारखान्याजवळ अपघातात दोन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत. हा अपघातही पाच वाजण्याच्या सुमारासच झाला. या अपघातातील जखमींना महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर आणखी एका अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे, त्याच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जानेवारीतील भीषण अपघाताची आठवणया अपघाताने परिसरातील नागरिकांचा थरकाप झाला. जानेवारीत झालेल्या भीषण अपघाताची आठवण यामुळे ताजी झाली. ५ जानेवारी २0१९ रोजी याच जागेवर फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने बेळगावकडे निघालेल्या कारला समोरुन धडक दिल्याने मुरगुड येथील जमादार कुटूंबियांतील सहाजण ठार झाले होते.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गkolhapurकोल्हापूर