कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीतील एकजण फरार आहे. या टोळीकडून घरफोडी व चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले असून, त्यातील सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये चार दुचाकी वाहने व २७ तोळे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अटक केलेल्यांची नावे अशी : रियाज इमाम कुचनूर (वय ३८, रा. कारंडे मळा, दुसरी गल्ली, शहापूर, इचलकरंजी), महेश ऊर्फ सलीम अल्लाउद्दीन नायकवडी (२३, रा. तीन बत्ती चौक, कलानगर, इचलकरंजी), सुलतान ऊर्फ इल्या ताजुद्दीन झांजे (२७, रा. गोठणपूर गल्ली, कुरुंदवाड), शिवम ऊर्फ पिल्या शिवाजी कीर्दक (२०, रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली), इकबाल सुबान पठाण (२८, रा. सदाशिवनगर, बेळगाव), तर अमोल (पूर्ण नाव समजू शकले नाही) हा फरारी आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोल्हापुरात गुजरी येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरी येथे सापळा रचून संशयितरीत्या फिरणाºया रियाज इमाम कुचनूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन सोन्याच्या पाटल्या मिळाल्या.
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २०१७ मध्ये इचलकरंजी येथील पारीख कॉलनीत केलेल्या घरफोडीतील या पाटल्या असल्याचे कबूल केले.या टोळीने इचलकरंजीतील पारीख कॉलनीतील आशिष विजय सिद्देश्वर, बंडगर माळ येथील तानाजी राजाराम भोसले, सांगली रोडवरील पाटील मळा येथील मंगल मधुकर सूर्यवंशी यांच्या घरी घरफोडी केल्याचे उघडकीस आले. तर सचिन बाळासाहेब शिंदे (रा. साईनगर गल्ली, इचलकरंजी), मुलका नभीलाल गुड्डेवाडा (रा. लिगाडे मळा, इचलकरंजी), श्रीराम शंकरराव नागावकर (रा. हरिपूजा पूरमनगर, कोल्हापूर) यांच्या दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी वाहने व काही दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला.चार घरफोड्या, एक चोरी, चार दुचाकी चोºया उघडया घरफोड्यांकडून चार घरफोड्या, एक चोरी, चार दुचाकीच्या चोºया असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी यातील चार दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच सुमारे सात लाख ९१ हजार ९४० रुपयांचे सोन्याचे २७ तोळे दागिने जप्त केले. या सर्वांची किंमत सुमारे नऊ लाख एक हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीअटक केलेल्या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. ४ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.चौघे घरफोडे, तिघे वाहन चोरसंशयित रियाज कुचनूर, महेश नायकवडी, सुलतान झांजे व फरार असणारा अमोल हे चौघेजण घरफोड्या व चोºया करीत होते, तर शिवम कीर्दक, इकबाल पठाण, युनूस मुल्ला हे दुचाकी चोºयांचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.एकाचा शोध सुरूरियाज कुचनूर याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आणखी सहा साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी आणखी पाचजणांना अटक केली, तर अमोल (पूर्ण नाव नाही) हा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.