कोल्हापूर : घर बांधणी, वाहन खरेदी, व्यवसाय उभारणीसाठी कमी कालावधीत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्'ातील पाचशे लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. इम्राण शेख (रा. आर. के. नगर) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या बागल चौकातील कार्यालयातील अविवाहित तरुणीला सोबत घेऊन पसार झाला आहे. फसवणूक झालेल्यामध्ये पन्हाळा, गगनबावडा आणि करवीर तालुक्यातील लोकांचा जास्त सहभाग आहे.
अधिक माहिती अशी, संशयित इम्राण शेख भामट्याने कोल्हापूर व कळे या दोन ठिकाणी खासगी फायनान्स कंपनीचे कार्यालय सुरू होते. गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, महिला बचत गटांना कर्ज कमी कालावधीत व कमी कागदपत्रामध्ये मिळेल, अशी जाहिरात त्याने केली होती. जिल्'ात सर्वत्र एजंटांचे जाळे पेरून त्यांच्यातर्फे लोकांकडून कर्जाचा अर्ज भरून प्रोसेसिंग फी म्हणून दहा टक्केरक्कम भरून घेतली. गेल्या वर्षभरात शेख याने जिल्'ात ५00 लोकांकडून पाच लाख रुपये कर्जासाठी ५० हजार रुपये, तर १ लाख रुपये कर्जासाठी १० हजार रुपये भरून घेतले.
शहरातील बागल चौक येथे त्याचे मुख्य कार्यालय होते. या ठिकाणी पाच ते सहा कर्मचारी नेमले होते. तसेच कळे येथील कार्यालयातही दोन कर्मचारी काम पाहत होते. तो आर. के. नगर परिसरात कुटुंबासह भाड्याने राहत होता. या ठिकाणी स्वत:चा बंगला असल्याचे तो लोकांना सांगायचा. पैसे भरून सहा महिने झाले, तरी शेख याने कर्ज मंजूर केले नाही; त्यामुळे लोक त्याच्या कार्यालयात फेऱ्या मारत होते. प्रत्येकवेळी तो कारणे सांगून टाळाटाळ करीत होता. १0 दिवसांपूर्वी बागल चौक कार्यालयातील २१ वर्षांच्या कर्मचारी तरुणीला घेऊन त्याने पलायन केले. मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे. शेख याच्याकडून किमान दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते. फसवणूक झालेल्या १00 ते १५0 लोकांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची भेट घेऊन, तक्रारी दिल्या. भामट्यासह तरुणीचा शोध पोलीस घेत आहेत.मायलेकरावर उपासमारीची वेळभामटा शेख हा पत्नी व मुलासह आर. के. नगर येथे राहत होता. तो तरुणीसह पळून गेल्याने पत्नी आणि मुलगा सैरभैर झाले आहेत. घराचे भाडे भागविणे, दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. या मायलेकरावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पैशाच्या लालसेपोटी शेखने पत्नी व मुलाचीही फसवणूक केली आहे.
संशयित इम्राण शेख याच्याविरोधात तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. कर्जाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.संजय मोरे : पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे