शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मुंबई-कोल्हापूर एक्सप्रेसमध्ये विसरलेले साडेपाच लाख रुपये रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 6:26 PM

मुंबई-कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेमध्ये मिरज रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपये रोख, चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती.

ठळक मुद्देजबलपूरमधील सुरेंद्रकुमार जैन यांची रेल्वेत होती विसरली बॅग रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल विशाल मानेंचे कौतुकरक्कम सुखरूप मिळाल्याने जैन यांनी मानले रेल्वे पोलिसांचे आभार

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेमध्ये मिरज रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपये रोख, चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती.

या बॅगेत मिळालेल्या पावती बुकावरील मोबाईल नंबरवरून ही बॅग जबलपूर (मध्यप्रदेश) येथील सुरेंद्रकुमार जैन (वय ४८) यांची असल्याचे लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे साडेपाच लाख रुपयांची रोख असलेली बॅग जैन यांना सुखरूप मिळाली, याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल विशाल माने यांचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेशातील जबलपूर येथील श्री वणी दिगंबर जैन गुरुकुलमध्ये सुरेंद्रकुमार जैन हे राहतात. गुरुवारी (दि. ७) रात्री ते मुंबई -कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेत बसले. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कुंथुगिरी (ता. हातकणंगले) येथील मठात जाण्यासाठी शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेस्थानकावर सोबतचे साहित्य घेऊन उतरले.

यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाची हँडबॅग मात्र रेल्वेतील आसनावर तशीच राहिली. काही वेळाने रेल्वेतील पोलीस कॉन्स्टेबल गार्ड विशाल माने हे आले. त्यांना प्रवाशाची बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर माने यांनी याची माहिती मिरजेतील वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी ए. के. मिश्रा यांना दिली.

मिश्रा यांनी कोल्हापुरात येऊन बॅगची तपासणी केली. बॅगेत साडेपाच लाख रुपये, ३० ग्रॅम वजनाची चांदीची जपमाळ, काही पुस्तके, ट्रस्टचे पावती बुक आणि डायरी होती. पोलिसांनी ट्रस्टच्या पावती बुकातील नंबरवरून मुंबईतील कार्यालयात फोन लावला. यानंतर मुंबईतील कार्यालयाने सुरेंद्रकुमार जैन यांना बॅग विसरल्याचे कळविले.

त्यानुसार ते सकाळी सहकाऱ्यांसह कोल्हापूर रेल्वेस्थानकात पोहोचले. याठिकाणी ओळख पटविल्यानंतर रेल्वे पोलिसांनी जैन यांच्याकडे बॅग सोपविली. यावेळी जैन यांचा पोलिसांनी जबाब घेतला. आश्रमाच्या कामासाठी आणलेली रक्कम सुखरूपपणे मिळाल्याने जैन यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

विशाल मानेंचा प्रामाणिकपणा...मूळ सोलापूर येथील असलेले विशाल माने हे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये गार्ड होते. शुक्रवारी पहाटे ते रेल्वेच्या एस-११ या बोगीत गेले. त्या ठिकाणी बहुतांश प्रवासी झोपेत होते. तेथील एका रिकाम्या आसनावर त्यांना लाल रंगाची बेवारस हँडबॅग निदर्शनास आली.

त्यांनी आसपासच्या प्रवाशांकडे त्याबद्दल विचारपूस केली; पण ती आपली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. हा प्रकार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला. विशाल माने यांच्यामुळेच जैन यांना साडेपाच लाख रुपये सुखरूपपणेमिळाले. याबद्दल माने यांचे अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीkolhapurकोल्हापूर