शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे पाच सदस्य काँग्रेसला पाठिंबा देणार?

By admin | Published: March 20, 2017 2:08 PM

चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच : सतेज पाटील, मुश्रीफ यांचा प्रकाश आवाडेंकडे ठिय्या

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांचा चढाओढ सोमवारी दुपारपर्र्यत कायम आहे. सत्तास्थापनेमध्ये शिवसेनाच किंगमेकर ठरणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्व आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या पाच सदस्यांचा गट काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिवसेनेने आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.दरम्यान, भाजता आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून शिवसेनेला गोंजारणेही सुरुच आहे. मात्र, शिवसेनेचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही संपले नाही, तर दुसरीकडे माजी आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ हे दोघेही दिग्गज इचलकरंजीत आवाडे यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसले आहेत. भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडी विरुध्द दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले आहे. काँग्रेसकडून माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल आणि भाजताकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सून शौमिका यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. उद्या दुपारी दोन वाजता त्यासाठी हात वर करुन जिल्हा परिषदेत मतदान होणार आहे.सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये आमदार सत्यजित पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील या तीन आमदारांसह शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, नेते संजयबाबा घाटगे, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवण आणि मुरलीधर जाधव आदी नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे.शिवसेनेची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद शिवसेनेचे चर्चेच्या फेऱ्या सुरु असून तीन आमदार, तीन जिल्हा प्रमुखांसह संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि इतर नेते निर्णय आज सायंकाळपर्यत घेणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचा निर्णय नक्की होणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवसेना पत्रकार परिषदेत पक्षाचा निर्णय जाहीर करणार आहेत. प्रकाश आवाडे यांची मनधरणी सुरुमाजी आमदार प्रकाश आवाडे यांनी राहुल पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला अध्यक्षपद देऊन रिस्क घेण्यापेक्षा माजी उपाध्यक्ष बंडा माने यांच्यासारख्या सर्वसमावेशक उमेदवाराला अध्यक्ष करावे, ही भूमिका घेतल्यामुळे आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ सोमवारी सकाळपासूनच इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसले आहेत. आवाडे यांनी पी.एन.पाटील यांनी आपल्या मुलाचा हट्ट सोडावा, अशी मागणी केली आहे. कोणीतरी उमेदवार ठरविणार आणि आम्ही होत वर करणार, ते दिवस आता गेले आहेत. आमचे दोन आणि राजू शेट्टी यांचे दोन अशा चार सदस्यांचा निर्णय एकत्र घेणार आहे, तशी चर्चा शेट्टी यांच्याशी झाल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आवाडे यांची मागणी काहीही असली तरी काँग्रेस उमेदवार बदलणार नाही, अशी भूमिका आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतल्यामुळे तिढा वाढला आहे.