कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यापासून लागण होत असलेल्या स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. एकीकडे सोमवारी एका दिवसात स्वाईन फ्लूचे सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आणि कोरोना रुग्णांची संख्या ४० वर पोहाेचल्यामुळे आरोग्य विभाग आणखी सक्रिय झाला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. रविवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत नवे आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. तर सोमवारी नव्याने एकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४० सक्रिय रूग्ण आहेत.दुसरीकडे एच३एन२चे रुग्णही वाढू लागले आहेत. आतापर्यंत २१ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. नंतरच्या चाचणीत यातील चारजण निगेटिव्ह आले. सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, ११ जण रुग्णालयात दाखल असून त्यातील पाच जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य स्थिती काळजीची बनत असून आरोग्य विभागानेही त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.मास्क वापराजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढायला लागला आहे. अशातच स्वाईन फ्लूचेही रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे. तर ज्यांना मधुमेह, रक्तदाब यासह अन्य जुने आजार आहेत त्यांनी तर बाहेर पडताना मास्क वापरण्याची गरज आहे. नागरिकांनीही दक्षतेचा उपाय म्हणून मास्क वापरावा असे आवाहन डाॅ. साळे यांनी केले आहे.
कोल्हापूरकरांनो सावधान! स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण ऑक्सिजनवर, कोरोना रुग्णसंख्याही वाढली; आरोग्य विभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:57 AM