काल सायंकाळी कुंभारवाडी येथे रस्त्याने जाताना एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते. ते भांडण काल रात्री तडजोड करून मिटविण्यात आले होते; मात्र आज पुन्हा रस्त्याने जाताना एकमेकाला आव्हान देऊन भांडण सुरू झाले व भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले या मारामारीमध्ये रंगराव शंकर कुंभार (वय ४५) रानोजी विष्णू सुतार (वय ७०) बाळू विष्णू सुतार (वय ६०) विठ्ठल विष्णू सुतार (वय ५५) राजू भाऊ सुतार (वय ४०) हे जखमी झाले आहेत. जखमीवर डी. वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.
इंद्रजीत रंगराव कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू भाऊ सुतार, रानोजी विष्णू सुतार, विठ्ठल विष्णू सुतार, अमर नंदू सुतार, विश्वनाथ बाळू सुतार, बाळू विष्णू सुतार, संजय भाऊ सुतार यांनी डोक्यात काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तर राजू भाऊ सुतार याने रंगराव शंकर कुंभार, इंद्रजीत रंगराव कुंभार, नीलेश विलास कुंभार, दत्तात्रय विष्णू कुंभार, ओंकार रंगराव कुंभार आदींनी कामावर जाताना रस्त्यात अडवून लोखंडी फरशीने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार केली असून राधानगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.