कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या कसबा बावडा शाखेत कर्जाला तारण दिलेल्या सोन्यावर डल्ला मारल्याने बॅँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इतर शाखांत असेच प्रकार घडलेत का? याची खातरजमा करण्यासाठी मुदत संपलेल्या कर्जाच्या सोन्याची तपासणी करण्यास जिल्हा बॅँकेने सुरुवात केली आहे.कसबा बावडा शाखेत कर्जासाठी तारण दिलेले सोने बदलण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर संबंधित ग्राहक बॅँकेकडे सोने परत घेण्यासाठी गेले असता सोने बदलण्याचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीअसून, बॅँकेच्या प्रशासनाने याचीगंभीर दखल घेतली आहे. बॅँकेने या शाखेतील प्रकाराची चौकशी सुरू केली आहेच; पण इतर शाखांत असे प्रकारघडले आहेत का? याची तपासणी केली जात आहे. ज्या कर्जांची मुदत संपलीआहे, त्यांच्या सोन्याची तपासणी सुरूझाली आहे. रविवारी दिवसभर बॅँकेचे कामकाज सुरू ठेवून कसून चौकशी सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.विनातारणमुळे ‘सोनेतारण’ला मागणीबॅँकांकडून कर्ज घ्यायचे म्हटले तर मालमत्ता तारण व जामीनदार, आदी गोष्टींची पूर्तता करावी लागते; पण सोनेतारण कर्जाला या गोष्टी लागत नाहीत. त्यात अनेक बॅँकांचा सोनेतारणचा व्याजदर कमी असल्याने याच कर्जाला पसंती असते.कसबा बावडा शाखेतील प्रकाराची बॅँकेने गंभीर दखल घेतली असून, यामधील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर मुदत संपलेल्या कर्जांच्या सोन्याची तपासणीही सुरू केली आहे.- आमदार हसन मुश्रीफ, अध्यक्ष, जिल्हा बॅँक
मुदतपूर्ण कर्जाच्या सोन्याची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:53 AM