कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताकदिनी बी.एस्सी. भाग दोनचा विद्यार्थी अमोद माळवी याचे पालक संजय आणि संगीता माळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माळवी हे मार्केट यार्ड येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मनोगत व्यक्त करताना संजय माळवी यांना अश्रू अनावर झाले. यावेळी संस्थेचे सचिव मोहन गरगटे, संचालक अण्णासाहेब अथणे, ॲड. अभिजीत कापसे, नरेंद्र देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद आदी उपस्थित होते. लेफ्टनंट प्रा. उमेश वांगदरे, प्रा. अश्विनी कोटणीस यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान, एनसीसी कॅडेट असलेल्या अमोद माळवी याची दिल्लीतील संचलन आणि पंतप्रधान रॅलीसाठी निवड झाली आहे.
फोटो (२७०१२०२१-कोल-महावीर महाविद्यालय) : कोल्हापुरात मंगळवारी महावीर महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताकदिनी बी.एस्सी. भाग दोनचा विद्यार्थी अमोद माळवी याचे पालक संजय आणि संगीता माळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शेजारी मोहन गरगटे, अण्णासाहेब अथणे, अभिजीत कापसे, नरेंद्र देसाई, राजेंद्र लोखंडे, बसवराज वस्त्रद उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव प्राचार्या शुभांगी गावडे प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. एनसीसी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त होणारे प्राध्यापक, कर्मचारी, पाठ्यपुस्तक लेखक, पीएच.डी. पदवी, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. डी. बी. पाटील, के. एस. तिवले, ए. एम. मुजावर, व्ही. बी. कदम, आर. व्ही. सदाफुले, शहिदा कच्छी, एस. एम. भोसले, जे. आर. भरमगोंडा, संतोष कुंडले, सी. बी. दोडमणी आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. किरण पाटील, एस. जी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. लाड यांनी आभार मानले.
फोटो (२७०१२०२१-कोल-विवेकानंद कॉलेज फोटो) : कोल्हापुरात मंगळवारी विवेकानंद महाविद्यालयात प्रजासत्ताकदिनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शेजारी शुभांगी गावडे, आर. आर. कुंभार आदी उपस्थित होते.
मास्टर दिनानाथ विद्यामंदिरमध्ये प्रजासत्ताक दिन
कोल्हापूर : येथील मास्टर दिनानाथ विद्यामंदिरमध्ये डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्रीपाद धरणगुत्ती यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. सन २०२०-२१ शाळेचे हस्तलिखित प्रकाशन करण्यात आले. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी स्वागत केले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित कायदा शपथ घेण्यात आली. प्रा. सूरज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शुक्रवारपेठ भगिनी मंडळाच्या सेक्रेटरी पद्मजा आडनाईक, उपाध्यक्षा पुष्पलता पाटील, नारायण येटाळे, सर्जेराव राबाडे, संतोष निगवेकर, मन्सुर बागवान आदी उपस्थित होते.