कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी कला मंच व विद्यामंदिर कुर्डु येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. यावेळी तंबाखु निर्मूलन जनजागृतीबाबत शपथ घेण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या हस्ते कागलकर हाऊसच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती वंदना जाधव, शिक्षण सभापती, रसिका पाटील , समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले,सदस्य प्रसाद खोबरे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक रवि शिवदास यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
१६०८२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रायव्हेट हायस्कूल
येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये संस्थेच्या कार्यवाह शरयू डिंगणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक माधव गोरे, पर्यवेक्षिका अंजेला चिटणीस, जिमखाना प्रमुख तुकाराम सकट यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सीताराम जाधव यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सुनील बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.