आजरा : हिरण्यकेशी नदीला आलेल्या महापुरामुळे साळगाव प्राथमिक शाळेस पाण्याचा तडाखा बसला. शाळेचा संगणकासह संपूर्ण दप्तर दोन दिवस पाण्यात होते. जि. प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांनी पूरग्रस्त शाळेला भेट देऊन पाहणी केली. पडलेली संरक्षक भिंत व शाळेला लागणारे शैक्षणिक साहित्य प्राधान्याने दिले जाईल, असे सांगितले.
मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर यांनी शाळेची संरक्षक भिंत कोसळली तर संगणक, किचनशेड, स्वच्छतागृहे आणि तीन वर्गखोल्यांमध्ये असणारे शालेय साहित्य आणि शालेय दप्तर यांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावेळी आजऱ्यातील नगरसेवक अभिषेक शिंपी यांनीही संरक्षक भिंतीच्या बांधकामसंदर्भात सूचना मांडल्या. शिंपी यांनी शाळेबरोबर गावातील इतरही पूरग्रस्त कुटुंबे आणि भागाचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी निवृत्ती मिटके, आनंदा कुंभार, उपसरपंच लक्ष्मण माडभगत, वसंत माडभगत, पोलीसपाटील सुरेश पाटील, हणमंत भालेकर, गणपती कांबळे, पांडुरंग पाटील, अर्जुन कुंभार, दयानंद कांबळे, शशिकांत सुतार, सुनील कुंभार, दिनकर वांद्रे, दशरथ कुंभार उपस्थित होते. संजय मोहिते यांनी सूत्रसंचालन केले, तर सत्यवान सोन्ने यांनी आभार मानले.
३० साळगाव शाळा भेट
फोटो कॅप्शन - साळगाव (ता. आजरा) येथील पूरग्रस्त प्राथमिक शाळेस भेटीप्रसंगी माहिती देताना जि. प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी. शेजारी मंजिरी यमगेकर, आनंदा कुंभार, लक्ष्मण माडभगत.