कागल : सन २०१९ च्या तुलनेत या वर्षी महापुराचे पाणी वेगाने वाढले. भविष्यात ही नदीकाठच्या गावांमध्ये असे पाणी येणार हे गृहीत धरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार कागल तालुक्यातील १९ गावांत पूरग्रस्त पुनर्वसन योजना युद्धपातळीवर राबविली जात आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर यांनी केले.
करनूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ फौडेंशनच्या वतीने औषधोपचार शिबिर, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच इम्रान नायकवडी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष तातोबा चव्हाण, सरपंच कविता घाटगे, महंमद शेख, अण्णासाहेब पाटील, सदाशिवराव पाटील, आदी पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावातील १७३ लोकांना चादर, तेल, तांदूळ, गहू आटा, डाळ, आदींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला. जयसिंग घाटगे यांनी स्वागत केले. बाळासाहेब पाटील, राजमहंमद शेख, तातोबा चव्हाण यांची भाषणे झाली. वैभव आडके यांनी सूत्रसंचालन केले, तर भाऊसाहेब नलावडे यांनी आभार मानले.
फोटो कॅपशन
करनूर (ता. कागल) येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात सभापती रमेश तोडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विकास पाटील, इम्रान नायकवडी, आदी उपस्थित होते.