शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Kolhapur Flood: शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम, ५ हजार लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:50 PM

प्रशासन सज्ज : ४ हजार जनावरेदेखील सुरक्षितस्थळी; पावसाच्या विश्रांतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात महापूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून जवळपास पूरबाधित गावांतील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी स्थलांतरित झाले असून, या गावातील चार हजार जनावरेदेखील बाहेर काढण्यात आली आहेत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले. २०१९ व २०२१ मधील अनुभव पाहता प्रशासनाच्या सूचनेअगोदरच पूरबाधित नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. सुरुवातीला खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, दानवाड, अकिवाट, कवठेसार, हेरवाड, कुरुंदवाड या गावांतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने यांत्रिकी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. एन.डी.आर.एफ. जवानांची तुकडीदेखील दाखल झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरग्रस्तांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, दत्त कारखाना शिरोळ, पद्माराजे विद्यालय शिरोळ, कुंजवन उदगाव याबरोबरच कुरुंदवाड येथील शाळांमध्येदेखील पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास बाराशेहून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला असून चारशेहून अधिक कुटुंबे निवारा केंद्रात तर तेराशेहून अधिक कुटुंबांनी स्वत:ची सोय केली आहे. जवळपास चार हजारांहून अधिक पशुधनाचेही स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये छावणीमध्येदेखील जनावरांची सोय करण्यात आली आहे.पूरग्रस्तांनी शोधला पर्याय२०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचा अनुभव घेता प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता पूरबाधित नागरिकांनी संभाव्य पुराचा धोका ओळखून पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला आहे. शिवाय पशुधनाचीही व्यवस्था केली आहे. प्रशासनानेही पूरग्रस्तांबरोबर पशुधनाच्या सोयीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरshirol-acशिरोळ