कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगेच्या पाणी पातळी घट न होता ती ४१.७ फुटांवरच स्थिर आहे. यात आज, शनिवारी पुन्हा १ इंचाने वाढ होवून ती ४१.८ फूट इतकी झाली आहे. अद्याप सात राज्य मार्ग व १९ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने ४४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. आतापर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले होते मात्र सद्या तीन दरवाजे बंद झाले आहेत.मागील गेली दोन दिवस पाऊस कमी आहे. दिवसभर कडकडीत ऊन तर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, पुराचे पाणी कमी होताना दिसत नाही. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची आवक कायम राहिली. अलमट्टी धरणातून प्रति सेकंद २ लाख २५ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, शनिवारी दुपारी १२ वाजता पंचगंगेची पातळी ४१.८ फूट असून ती कालपासून स्थिरच आहे.
धामणी, तुळशी खोरे मोकळे होण्यास सुरुवात
पावसाने उघडीप दिली असली तरी धामणी, कासारी खोऱ्यातील पाणी पहिल्यांदा कमी होते. त्यानंतर कुंभी, भोगावती मग पंचगंगेची पातळी कमी होत जाते. शुक्रवारी दुपारनंतर धामणी व तुळशी खोरे हळूहळू मोकळे झाले.
पडझडीत १६.६९ लाखांचे नुकसान
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एक सार्वजनिक, तर ६२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ६९ हजारांचे नुकसान झाले आहे.
एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाकोल्हापूर ते रत्नागिरी (केर्ली येथे पाणी)संभाजीनगर ते मानबेटगडहिंग्लज ते चंदगडचंदगड ते माणगावगगनबावडा ते भुईबावडाआजरा ते गारगोटी
धरणातून विसर्ग, प्रति सेकंद घनफूटमध्ये -राधानगरी - ४४५६तुळशी - १७५४वारणा- ९३७१दुधगंगा - ५८१६
पाऊस जरी थांबला असला तरी ५० किलोमीटर नदीपात्रात पाणी आहे. ते पुढे सरकेल तसे त्या परिसरातील पुराचे पाणी कमी होत जाते. उघडझाप अशीच राहिली तर आज, शनिवारपासून झपाट्याने पाणी कमी होऊ शकते. - रोहित बांदिवडेकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे)