शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:52 AM

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला. पंचगंगेची पातळी कमी होऊन ४१ फूट ३ इंचांवर आली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरी धरण ९२ टक्के भरून २२०० क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम होती. पंचगंगेची पातळी इंचइंचाने कमी होत असली तरी पसरलेले पाणी रस्त्यांवर असल्याने अद्याप राज्यमार्गांसह अन्य ३१ मार्ग बंद असून, ५५ बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. रविवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत १७९.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१.५० मि.मी. पाऊस पडला. त्याखालोखाल आजरा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसाने रविवारी राधानगरी धरणामध्ये भर पडून ते ९२ टक्के भरले. येथून २२०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी रविवारी दिवसभरात इंचाइंचाने कमी झाली. यामध्ये शनिवारी (दि. २२) धोक्याच्या पातळीजवळ ४१ फूट ९ इंचांवर असलेली पंचगंगेची पातळी कमी होऊन ती रविवारी सायंकाळी सहापर्यंत ४१ फूट ३ इंचांवर आली. अद्याप पाणी धोक्याच्या पातळीजवळ असल्याने पूरस्थिती कायम आहे.एस.टी.चे २९ वाहतूक मार्ग बंदअतिवृष्टीने जिल्ह्यातील २९ मार्गांवरील एस. टी. बसची वाहतूक अंशत: तसेच पूर्णत: बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, गारगोटी-सावर्डे, गारगोटी-बाचणी, गारगोटी-केळेवाडी, गारगोटी-मालवाडी, मलकापूर-गावडी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रंकाळा, रंकाळा-बावेली, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-स्वयंभूवाडी, रंकाळा-गगनबावडा, रंकाळा-अणुस्कुरा, रंकाळा-गुडाळ, रंकाळा-भोगावती, रंकाळा-तारळे, इचलकरंजी-कागल, इचलकरंजी-बोरगाव, कागल-बस्तवडे, कागल-नंद्याळ, कागल-इचलकरंजी, राधानगरी-तारळे, राधानगरी-शिरगाव, गगनबावडा-कोल्हापूर, गगनबावडा-धुंदवडे या मार्गांवरील वाहतूक अंशत: व पूर्णत: बंद झाली आहे.पावणेपाच लाखांचे नुकसानकागल, भुदरगड, शाहूवाडी, करवीर, राधानगरी तालुक्यांत पावसामुळे पक्क्या व कच्च्या घरांसह जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन १९ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे ४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४०८.२५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत १७९.०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ३१.५० मि.मी., राधानगरीमध्ये २०.३३ मि.मी., चंदगडमध्ये २३.८३ मि.मी., आजऱ्यात २६.५० मि.मी., कागलमध्ये ५.७१ मि.मी., शाहूवाडीत २३.३३ मि.मी., भुदरगडमध्ये १२.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.८७ मि.मी., शिरोळमध्ये १.८५ मि.मी., पन्हाळ्यात २४.५७ मि.मी., करवीरमध्ये ४.५४ मि.मी., गडहिंग्लज मध्ये २.०० मि.मी. पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील ३१ मार्ग बंदजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाच राज्यमार्गांसह नऊ प्रमुख जिल्हा, १२ इतर जिल्हा व पाच ग्रामीण असे ३१ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये चंदगड-इब्राहिमपूर-चितळे-शिगरवाडी-आजरा, कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-चिखली-यवलूज-पुनाळ-बाजारभोगाव-करंजफेण, आदी प्रमुख राज्यमार्ग; शेणवडे-अणदूर-धुंदवडे-राशिवडे, येवती-बाचणी-साके-सावर्डे, आकनूर-खिंडी व्हरवडे-गुडाळ-तारळे-पडसाळी-गारिवडे, आदी प्रमुख जिल्हा मार्ग, शाहूवाडी-कोळगाव-टेकोली-पणुंद्रे, कुडित्रे-वाकरेपाटी-खुपिरे-शिंदेवाडी, कोल्हापूर-वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठ-शिंगणापूर, आदी इतर जिल्हा मार्ग व शिरोळ-सोंडमोळी, आरे-सावरवाडी, म्हसवे-गारगोटी, इचलकरंजी-चंदूर-रुई, तिसंगी-टेकवाडी, आदी ग्रामीण मार्गांचा समावेश आहे.