शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
4
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
5
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
6
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
7
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
8
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
9
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
10
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
11
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
12
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
13
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
14
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
15
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
16
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
17
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
18
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
19
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

राधानगरी भरले, दूधगंगेतून पाणी सोडले; कोल्हापूरला पुराचा धोका

By राजाराम लोंढे | Published: July 24, 2024 4:17 PM

कोल्हा पूर : कोल्हा पूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ओलांडणार आहे. राधानगरी धरण ९५ टक्के भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले होणार असून, दूधगंगेतून पाणी सोडले आहे. वारणा धरणातूनही ८८७४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे. तब्बल ६३ मार्गांवरील वाहतूक थांबल्याने निम्मा जिल्हा ठप्प झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पूरबाधीत गावातील नागरिकांना हलवण्यात आले आहे.जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. एकसारख्या सरी कोसळत असून, धरणक्षेत्रात, तर अक्षरश: झोडपून काढले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे. दूधगंगा धरण ७१ टक्के भरले असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १६०० घनफूट पाणी दूधगंगेत येत आहे. वारणा धरणातून अगोदरच प्रतिसेकंद ३८०० घनफूट विसर्गात वाढ करून वक्र दरवाजातून ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्रमधून १६५८, असे एकूण ८८७४ घनफूटचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आल्याने पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे.पडझडीत ४९.५९ लाखांचे नुकसानजिल्ह्यात एका सार्वजनिक मालमत्तेसह १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ४९ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.एसटीचे २० मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे २० मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.असे आहेत मार्ग बंद..राज्य मार्ग - १०प्रमुख जिल्हा मार्ग - २४इतर जिल्हा मार्ग - ७ग्रामीण मार्ग - २२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीfloodपूर