गावातील संपूर्ण शेती पुराच्या पाण्यात असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गाव पाणीपुरवठ्याची मोटर पेटी अद्याप पाण्यात असल्याने नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. दानोळी येथील पुराचे पाणी गावाबाहेर गेले असून मळाभागातील अनेक घरे पाण्यातच आहेत. स्थलांतरितांना घराची ओढ लागली आहे. पण पुराचे पाणी संथगतीने ओसरत असल्याने घराची काळजी वाढत आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील वारणा नदीकाठच्या कवठेसार, दानोळी, कोथळी उमळवाड या गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून २०१९च्या महापुरातील नुकसानाचे ओझे डोक्यावर असताना पुन्हा महापुरामुळे झालेले नुकसान कसे भरून काढणार हा मोठा प्रश्न आहे.
फोटो ओळ - कवठेसार येथील नागरिक पिण्याचे पाणी आणण्यासाठी अशी कसरत करीत आहेत.