रमेश पाटीलकसबा बावडा: कसबा बावडा-शिये रस्त्यावर आज, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या, बुधवारी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ ४० फूट ६ इंच इतकी पाणी पातळी होती. ४३ फुटावर पाणी पातळी गेल्यास बावडा -शिये मार्गावर दोन अडीच फूट पाणी येऊन हा मार्ग बंद होतो. अशा पाण्यातूनही काही वाहनधारक धोका पत्करून ये-जा करत असतात. मात्र जशी बंधाऱ्याजवळ पाणीपातळी वाढत जाईल तसे या मार्गावरील पाणी वाढत जाऊन हा मार्ग बंद होतो.खबरदारी म्हणून पोलिसांनी शुगर मिल कॉर्नर येथे बॅरिकेट्स आणून ठेवली आहेत. पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाल्यास हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. मार्ग बंद झाल्यास औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावरून लांबचा वळसा टाकून ये-जा करावी लागणार आहे.
कोल्हापुरात कसबा बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:22 PM