सचिन भोसले
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका प्राण्यांसह सरपटणाऱ्या जीवांना बसला आहे. दोन दिवसात सर्प व प्राणिमित्रांनी २६ नाग सापांसह १५ माकडांची सुटका करून त्यांना त्यांच्या अधिवासात सुखरूप सोडले.
शहराच्या विविध भागात पुराचे पाणी घुसले आहे. त्याचा फटका साप, धामण, घोणस, नानाटी, कवड्या, तस्कर आदी जातीच्या सापांनाही बसला आहे. त्यांच्या राहण्याच्या बिळामध्ये पाणी शिरल्याने ते कोरड्या जागी अर्थात घरांच्या कम्पाउंडलगत अथवा इमारतींच्या आश्रयाला येण्याचे प्रमाण वाढले आहे. जसजशी शहरातील विविध भागातील पाण्याची पातळी कमी होईल तसे हे सर्प पकडण्यासाठी सर्प व प्राणिमित्रांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे.
गेले दोन दिवसात वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन रिसर्च सोसायटीच्या देवेंद्र भोसले, आशुतोष सूर्यवंशी, शरद जाधव, प्रदीप सुतार, अलमतीन बांगी, विनायक माळी, विनायक आळवेकर, अशांत मोरे, अश्विनी जाधव, स्मिता बागल, प्रमोद पाटील, राहुल मंडलिक, विजय गेंजगे, रोहित शिर्के, मयूर लवटे, श्वेता सुतार, स्नेहा जाधव, गणेश कदम, विकास पाटील या सदस्यांनी दिवसात साने गुरुजी वसाहत, देवकर पाणंद, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी आदी परिसरातून तब्बल २० नाग सर्प पकडून ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. तर सर्प मित्र धनंजय नामजोशी यानेही मोहिते पार्क परिसरातून ३ धामण व एक सर्प पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. प्राणिमित्र डॉ. संतोष आळवेकर यांनी तर वाघवे (ता. पन्हाळा) येथे जाऊन पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ माकडांना सुखरूप बाहेर काढून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले.
फोटो २४०७२०२१, कोल सर्प
ओळी : वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन रिसर्च सोसायटीचे सदस्य साने गुरुजी वसाहतीत पकडलेल्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडताना.
(कोल डेस्क फोटो मेल केला आहे.)