उत्तूर : आरदाळ (ता.आजरा) येथील सुमन जोशी या विधवा महिलेच्या घराचे छप्पर अचानक आलेल्या वादळी वा-याने उडून गेले. याबाबतचे वृत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. हे वाचून या कुटूंबाला मदतीचा हात पुढे आला आहे.आजरा येथील रवळनाथ हौसींग फायनान्स सोसायटीचे चेअरमन एम.एल.चौगुले यानी आरदाळ येथे जाऊन जोशी परीवाराची भेट घेतली व पंचवीस हजार रुपयाचा धनादेश दिला. चौगुले म्हणाले,आमची संस्था आपती काळात नेहमीच मदत करते. संस्थेने यापुर्वी अतिवृष्टीमध्ये घरे वाहून गेलेल्या नागरीकाना मदत केली आहे. जोशी परिवाराची हलाखीची परिस्थिती पाहून त्याना मदत करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान जोशी परिवाराची गावच्या भैरीदेव मंदीरात ग्रामस्थानी तात्पूरती सोय केली आहे. जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यानी या परिवाराची भेट घेवून घरावर छप्पर घालून देण्याची तयारी दर्शवली. आपटे यानी तातडीची मदत म्हणून आठवडाभर पुरेल इतके धान्य पाठवले.
सामाजीक कार्यकर्ते शिवाजी गुरव यानी शेगडी व सिलेंडरची सोय केली. गंगापुरे कापड दुकान यांच्या वतीने साड्या, ब्लँकेट,लहान बाळासाठी गादी, मच्छरदाणी आदी साहित्य दिले. दोन दिवसात या घरावर छप्पर उभारण्यासाठी दानशूर नागरीक प्रयत्न करीत आहेत. यावेळी उपसरपंच अमोल बाबरे आदीसह नागरिक उपस्थित होते.